Bigg Boss Marathi Season 6
Bigg Boss Marathi Season 6

Bigg Boss Marathi Season 6 : 'दरवेळेची नाटक आहेत यार...' म्हणत सागर कांरडे आणि तन्वीमध्ये वादाचा डोंगर

काम करत असताना दोघांमध्ये गैरसमज झाला आणि शब्दांची देवाणघेवाण सुरू झाली. तन्वीने सागरच्या बोलण्यावर नाराजी व्यक्त केली, तर सागरनेही माघार घेतली नाही.
Published by :
Riddhi Vanne
Published on

कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पुन्हा एकदा वादाचा भडका उडाला आहे. नुकत्याच आलेल्या प्रोमोमुळे घरातील तणाव चांगलाच वाढल्याचं दिसतंय. किचनमध्ये सागर (Sagar Karde) आणि तन्वी (Tanvi Kolte) यांच्यात अचानक सुरू झालेलं बोलणं थेट जोरदार भांडणात बदललं.

काम करत असताना दोघांमध्ये गैरसमज झाला आणि शब्दांची देवाणघेवाण सुरू झाली. तन्वीने सागरच्या बोलण्यावर नाराजी व्यक्त केली, तर सागरनेही माघार घेतली नाही. दोघांचाही सूर चढत गेल्याने वातावरण अधिकच तापलं. इतर सदस्यांनी वाद थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही.

हा संघर्ष इतका वाढला की घरातील शांतता पूर्णपणे बिघडली आहे. आता या भांडणाचा खेळावर काय परिणाम होणार आणि बिग बॉस यावर काय निर्णय घेतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सागर आणि तन्वीमधील हे नाट्य पुढे आणखी वाढणार की गैरसमज दूर होणार, हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका.

थोडक्यात

  • कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पुन्हा एकदा वादाचा भडका उडाला आहे.

  • नुकत्याच आलेल्या प्रोमोमुळे घरातील तणाव चांगलाच वाढल्याचं दिसतंय.

  • किचनमध्ये सागर आणि तन्वी यांच्यात अचानक सुरू झालेलं बोलणं थेट जोरदार भांडणात बदललं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com